Thursday, 22 December 2011

जर मनच अशुद्ध तर.....

खूप जुनी गोष्ट आहे. एकदा संत कबीर बसले होते. त्यांच्याकडे एक व्यापारी धावत आला. त्याने कबीरांना विनंती केली, 'मला तुम्हाला माझा गुरू करायचे आहे, तुम्ही मला गुरुमंत्र द्या' तेव्हा संत कबीरांनी त्याला पैसे दिले आणि सांगितले आधी तू पटकन जाऊन दूध घेऊन ये, मग मी तुला गुरुमंत्र देतो. 

त्या व्यापाऱ्याला खूप घाई होती. तो तडक धावत गेला आणि त्याने दूध कबीरांना आणून दिले. कबीरांनी त्याला एक भांडे दिले आणि सांगितले, हे दूध या भांड्यात ओत. त्याने ते भांडे घेतले, त्यात प्रचंड घाण साचली होती. त्या व्यापाऱ्याने कबीरांना ही बाब सांगितली. ते म्हणाले, बघ जर तू या खराब भांड्यात दूध टाकायला तयार नाहीस तर, मग मी तुझ्या अशुद्ध मनात राम नावाचा मंत्र कसा देऊ? ' 

कबीरांनी म्हटलेले वाक्य किती खरे आहे बघा? जर तुमचे मनच शुद्ध नाही तर तुम्ही देवाचे दर्शन घेतले काय, किंवा संत सानिध्यात राहिलात काय, त्याचा काय परिणाम होणार? 

संतांनीही हेच सांगितले आहे. भलेही तुम्ही पुजा नका करू, परंतु तुम्ही तुमचे आचरण, आणि मन शुद्ध ठेवा. आपण इतरांना एखाद्या कामासाठी दोष देत असतो, पण त्याची त्यामागची भूमिका समजून घेणे गरजेचे असते. आणि आपण नेमके या उलटच करतो. 

आपल्या दैनंदिन कामात आपण अनेकांना भेटत असतो, यात प्रत्येक व्यक्ती आपल्याला चांगलीच भेटते असे नाही, तर प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असून शकतो. त्यांच्या स्वभावानुसार त्यांना काम देणे गरजेचे आहे. 

बदलायची असतील तर त्यांची मने बदलण्याचा प्रयत्न तुम्ही करा. त्यांच्या मनातील कटुता कमी करा. कारण कबीरांनी म्हटल्याप्रमाणे, खराब भांड्यात ज्या प्रमाणे तुम्ही दूध नाही टाकणार त्या प्रमाणेच एखाद्याचे मन परिवर्तन झाल्याशिवाय तुम्ही त्याला बदलू नाही शकणार.

नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा



एकदा एक अनुभवी आणि वृध्द गुरू आपल्या शिष्याच्या तक्रारींना कंटाळून गेले होते. एके दिवशी सकाळी त्यांनी त्या शिष्याला थोडे मीठ आणायला सांगितले.
तो शिष्य मीठ घेऊन परतला तेव्हा गुरूंनी त्या दुखी तरूणाला त्यातील मूठभर मीठ एका एका पाणी भरलेल्या पेल्यात टाकून ते पिण्यास सांगीतले.
’पाणी चवीला कसे लागले ?‘ गुरूंनी विचारले.
‘कडु’ असे म्हणून शिष्याने ते पाणी थुंकले.
गुरूंनी मंद हास्य केलं आणि पुन्हा त्या शिष्याला मुठभर मीठ त्या तळयात टाकण्यास सांगितले. ते दोघे तळयाजवळ आले.
शिष्याने मूठभर मीठ त्या तळयात मिसळल्यानंतर ते वृध्द गुरू म्हणाले, ‘आता या तळयातील पाणी पिऊन पहा.‘
त्याच्या हनुवटीवरून पाणी खाली ओघळल्यावर गुरूंनी त्याला विचारलं, आता यापाण्याची चव कशी आहे ?‘
‘ताजी आणि मधुर !‘ शिष्याने सांगितले.
‘आता तुला मिठाची चव लागतेय ?‘
‘नाही‘.
गुरू त्या शिष्याच्या जवळ बसले आणि त्यांनी त्याचा हात आतात घेतला. ते म्हणाले, ‘आयुष्याची चवही अगदी मिठासारखीच असते. आयुष्यातील दुखही तेवढच असतं, परंतु आपण ते दुख कशात मिसळतो यावर त्याचा कडवटपणा अवलंबुन असतो. म्हणून जेव्हा आापण दुखात असतो तेव्हा आपण एकच गोष्ट करू शकतो. ती म्हणजे, आपण आपल्या भावना व विचार व्यापक ठेवल्या पाहिजेत. पेला होणं थांबवून तळं होण्याचा प्रयत्न केला पाहिजे.‘

तात्पर्यः नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा.

Wednesday, 14 December 2011

निंदा आणि पाप

एका गावामध्ये एक सात्विक म्हातारी राहत असे. एकदा तिच्याकडे ३ जण साधू आले.
त्या म्हातारीने त्यांचे स्वागत केले आणि चहा टाकण्यासाठी ती आत मध्ये गेली.
परंतु चहा बनवायला दुध नव्हते घरात म्हणून ती शेजारणीकडे दुध आणायला गेली.
आणि येताना मात्र एक विचित्र प्रकार घडला आकाशात घार सापाला घेवून जात होती तेवढ्यात सापच्यातोंडातले विष त्या म्हातारीच्या दुधामध्ये पडतं.पण म्हातारीला ते माहित नसत.
ती जाते त्या साधू महाराजांना चहा देते, पण चहा पिवून ३ साधू मरण पावतात.
आता चित्र गुपातला हा प्रश्न पडतो कि हे पाप कोणाच्या नावावर लिहायचे
कारण,म्हातारीची काय चुकी नव्हती ती चांगल्या मानाने चहा बनवत होती,गरुडाची चूक मानवी तर ते आपल भक्ष खात होत,सापाची चूक मानवी तर ते आपल्या भीती पोटी तोंडातून विष टाकत होत.
 म्हणून तो विष्णूकडे जातो.
आणि वाष्णूला सर्व हकीकत सांगतो. तेव्हा देव बोलतो २ दिवस थांबा मी सांगतो की हे पाप कोणाच्या नावावर लिहायचे ते.
मग त्या म्हातारीच्या गावात साधू मेल्यालीची बातमी वार्यासारखी पसरते.एका आडावर दोन बायका
 पाणी भारत असतात आणि त्या आप आपसात बोलत असतात कि त्या म्हातारीने त्या साधूला विष देवून मारलं म्हणून ..
तेव्हा ते देव बगतो आणि चित्रगुप्ताला सांगतो कि ह्याचं पाप ह्या निंदा करणार्यावर लिहा.
म्हणून कोणाची निंदा करू नये.

Sunday, 11 December 2011

ईश्वराने सृष्टीची निर्मिती केली


ईश्वराने सृष्टीची निर्मिती केली. मानव नावाचा अदभूत प्राणीही निर्माण केला. त्याला तयार करताना मात्र देवाला खूप
त्रास झाला. मानवाच्या निर्मितीनंतर हा त्रास वाढू लागला तेव्हा ईश्वराने सार्‍या देवतांना बोलाविले व विचारले,
माणसाला तयार करुन मी संकटात सापडलो आहे. मला चोवीस तास हाका ऐकून घ्याव्या लागतात.
सारखं वाटतं की, माणूस सतत माझ्या दाराजवळ उभा राहून तक्रार करत आहे. त्यामुळे मला
शांतपणे झोपही लागत नाही. मी काय करु ? कोठे लपू ? जेथे माणूस येणार नाही अशी जागा सांगा ?
या प्रश्नानंतर ईश्वराला त्या सार्‍या देवतांनी अनेक जागा सुचविल्या. पण ईश्वराला वाटले काहीही करुन
माणूस तेथे पोहचणारच. म्हणून त्याने त्या सर्व जागा नाकारल्या अखेर एक म्हातारा देव उठला !
त्याने ईश्वराला कानात काहीतरी सांगितले. ईश्वरालाही ते पटले. त्या वृद्ध देवाने सांगितले होते की,
तू माणसाच्या आत हृदयात लपून बैस. ईश्वराने तसे केले आणि तो सुखी झाला.