Monday, 26 December 2011
Thursday, 22 December 2011
जर मनच अशुद्ध तर.....
खूप जुनी गोष्ट आहे. एकदा संत कबीर बसले होते. त्यांच्याकडे एक व्यापारी धावत आला. त्याने कबीरांना विनंती केली, 'मला तुम्हाला माझा गुरू करायचे आहे, तुम्ही मला गुरुमंत्र द्या' तेव्हा संत कबीरांनी त्याला पैसे दिले आणि सांगितले आधी तू पटकन जाऊन दूध घेऊन ये, मग मी तुला गुरुमंत्र देतो.
त्या व्यापाऱ्याला खूप घाई होती. तो तडक धावत गेला आणि त्याने दूध कबीरांना आणून दिले. कबीरांनी त्याला एक भांडे दिले आणि सांगितले, हे दूध या भांड्यात ओत. त्याने ते भांडे घेतले, त्यात प्रचंड घाण साचली होती. त्या व्यापाऱ्याने कबीरांना ही बाब सांगितली. ते म्हणाले, बघ जर तू या खराब भांड्यात दूध टाकायला तयार नाहीस तर, मग मी तुझ्या अशुद्ध मनात राम नावाचा मंत्र कसा देऊ? '
कबीरांनी म्हटलेले वाक्य किती खरे आहे बघा? जर तुमचे मनच शुद्ध नाही तर तुम्ही देवाचे दर्शन घेतले काय, किंवा संत सानिध्यात राहिलात काय, त्याचा काय परिणाम होणार?
संतांनीही हेच सांगितले आहे. भलेही तुम्ही पुजा नका करू, परंतु तुम्ही तुमचे आचरण, आणि मन शुद्ध ठेवा. आपण इतरांना एखाद्या कामासाठी दोष देत असतो, पण त्याची त्यामागची भूमिका समजून घेणे गरजेचे असते. आणि आपण नेमके या उलटच करतो.
आपल्या दैनंदिन कामात आपण अनेकांना भेटत असतो, यात प्रत्येक व्यक्ती आपल्याला चांगलीच भेटते असे नाही, तर प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असून शकतो. त्यांच्या स्वभावानुसार त्यांना काम देणे गरजेचे आहे.
बदलायची असतील तर त्यांची मने बदलण्याचा प्रयत्न तुम्ही करा. त्यांच्या मनातील कटुता कमी करा. कारण कबीरांनी म्हटल्याप्रमाणे, खराब भांड्यात ज्या प्रमाणे तुम्ही दूध नाही टाकणार त्या प्रमाणेच एखाद्याचे मन परिवर्तन झाल्याशिवाय तुम्ही त्याला बदलू नाही शकणार.

नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा
एकदा एक अनुभवी आणि वृध्द गुरू आपल्या शिष्याच्या तक्रारींना कंटाळून गेले होते. एके दिवशी सकाळी त्यांनी त्या शिष्याला थोडे मीठ आणायला सांगितले.
तो शिष्य मीठ घेऊन परतला तेव्हा गुरूंनी त्या दुखी तरूणाला त्यातील मूठभर मीठ एका एका पाणी भरलेल्या पेल्यात टाकून ते पिण्यास सांगीतले.
’पाणी चवीला कसे लागले ?‘ गुरूंनी विचारले.
‘कडु’ असे म्हणून शिष्याने ते पाणी थुंकले.
गुरूंनी मंद हास्य केलं आणि पुन्हा त्या शिष्याला मुठभर मीठ त्या तळयात टाकण्यास सांगितले. ते दोघे तळयाजवळ आले.
शिष्याने मूठभर मीठ त्या तळयात मिसळल्यानंतर ते वृध्द गुरू म्हणाले, ‘आता या तळयातील पाणी पिऊन पहा.‘
त्याच्या हनुवटीवरून पाणी खाली ओघळल्यावर गुरूंनी त्याला विचारलं, आता यापाण्याची चव कशी आहे ?‘
‘ताजी आणि मधुर !‘ शिष्याने सांगितले.
‘आता तुला मिठाची चव लागतेय ?‘
‘नाही‘.
गुरू त्या शिष्याच्या जवळ बसले आणि त्यांनी त्याचा हात आतात घेतला. ते म्हणाले, ‘आयुष्याची चवही अगदी मिठासारखीच असते. आयुष्यातील दुखही तेवढच असतं, परंतु आपण ते दुख कशात मिसळतो यावर त्याचा कडवटपणा अवलंबुन असतो. म्हणून जेव्हा आापण दुखात असतो तेव्हा आपण एकच गोष्ट करू शकतो. ती म्हणजे, आपण आपल्या भावना व विचार व्यापक ठेवल्या पाहिजेत. पेला होणं थांबवून तळं होण्याचा प्रयत्न केला पाहिजे.‘
तात्पर्यः नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा.
Wednesday, 14 December 2011
निंदा आणि पाप
एका गावामध्ये एक सात्विक म्हातारी राहत असे. एकदा तिच्याकडे ३ जण साधू आले.
त्या म्हातारीने त्यांचे स्वागत केले आणि चहा टाकण्यासाठी ती आत मध्ये गेली.
परंतु चहा बनवायला दुध नव्हते घरात म्हणून ती शेजारणीकडे दुध आणायला गेली.
आणि येताना मात्र एक विचित्र प्रकार घडला आकाशात घार सापाला घेवून जात होती तेवढ्यात सापच्यातोंडातले विष त्या म्हातारीच्या दुधामध्ये पडतं.पण म्हातारीला ते माहित नसत.
ती जाते त्या साधू महाराजांना चहा देते, पण चहा पिवून ३ साधू मरण पावतात.
आता चित्र गुपातला हा प्रश्न पडतो कि हे पाप कोणाच्या नावावर लिहायचे
कारण,म्हातारीची काय चुकी नव्हती ती चांगल्या मानाने चहा बनवत होती,गरुडाची चूक मानवी तर ते आपल भक्ष खात होत,सापाची चूक मानवी तर ते आपल्या भीती पोटी तोंडातून विष टाकत होत.
म्हणून तो विष्णूकडे जातो.
आणि वाष्णूला सर्व हकीकत सांगतो. तेव्हा देव बोलतो २ दिवस थांबा मी सांगतो की हे पाप कोणाच्या नावावर लिहायचे ते.
मग त्या म्हातारीच्या गावात साधू मेल्यालीची बातमी वार्यासारखी पसरते.एका आडावर दोन बायका
पाणी भारत असतात आणि त्या आप आपसात बोलत असतात कि त्या म्हातारीने त्या साधूला विष देवून मारलं म्हणून ..
तेव्हा ते देव बगतो आणि चित्रगुप्ताला सांगतो कि ह्याचं पाप ह्या निंदा करणार्यावर लिहा.
म्हणून कोणाची निंदा करू नये.

Sunday, 11 December 2011
ईश्वराने सृष्टीची निर्मिती केली
ईश्वराने सृष्टीची निर्मिती केली. मानव नावाचा अदभूत प्राणीही निर्माण केला. त्याला तयार करताना मात्र देवाला खूप
त्रास झाला. मानवाच्या निर्मितीनंतर हा त्रास वाढू लागला तेव्हा ईश्वराने सार्या देवतांना बोलाविले व विचारले,
माणसाला तयार करुन मी संकटात सापडलो आहे. मला चोवीस तास हाका ऐकून घ्याव्या लागतात.
सारखं वाटतं की, माणूस सतत माझ्या दाराजवळ उभा राहून तक्रार करत आहे. त्यामुळे मला
शांतपणे झोपही लागत नाही. मी काय करु ? कोठे लपू ? जेथे माणूस येणार नाही अशी जागा सांगा ?
या प्रश्नानंतर ईश्वराला त्या सार्या देवतांनी अनेक जागा सुचविल्या. पण ईश्वराला वाटले काहीही करुन
माणूस तेथे पोहचणारच. म्हणून त्याने त्या सर्व जागा नाकारल्या अखेर एक म्हातारा देव उठला !
त्याने ईश्वराला कानात काहीतरी सांगितले. ईश्वरालाही ते पटले. त्या वृद्ध देवाने सांगितले होते की,
तू माणसाच्या आत हृदयात लपून बैस. ईश्वराने तसे केले आणि तो सुखी झाला.

Saturday, 10 December 2011
***आयुष्याच्या चारोळ्या***
***आयुष्याच्या चारोळ्या***
*फूलाच आयूष्य फार खडतर असतं,
बहरलेल असताना भाळी असनं,
आणी कोमजून जाताच,
कोणाच्यातरी पायदळी असणं.
*झेपेल तेवढ दु:ख
तो आपल्याला देतो,
दिलेल दु:ख संपल की,
तो आपल्यालाच नेतो.
*मला पक्क ठाऊक आहे की,
प्रत्येक गोष्टीला अंत आहे,
म्हनून मी काही बोलत नाही,
मी अगदी शांत आहे.
*आपल्याला काही हव असन
म्हनजे आपल जगनं आहे,
येणार्या प्रत्येक क्षणांकडे,
आपल काही मागणं आहे.
*तळ्याकटच गवत तळ्याशी
सलगीन वागायचं कारण,
त्याला जगायला,
तळ्याचंच पाणी लागायचं.
*पाण्याचं वागन कीती वीसंगत,
पोहणार्याला बूडवून,
प्रेताला ठेवत तरंगत.
बहरलेल असताना भाळी असनं,
आणी कोमजून जाताच,
कोणाच्यातरी पायदळी असणं.
*झेपेल तेवढ दु:ख
तो आपल्याला देतो,
दिलेल दु:ख संपल की,
तो आपल्यालाच नेतो.
*मला पक्क ठाऊक आहे की,
प्रत्येक गोष्टीला अंत आहे,
म्हनून मी काही बोलत नाही,
मी अगदी शांत आहे.
*आपल्याला काही हव असन
म्हनजे आपल जगनं आहे,
येणार्या प्रत्येक क्षणांकडे,
आपल काही मागणं आहे.
*तळ्याकटच गवत तळ्याशी
सलगीन वागायचं कारण,
त्याला जगायला,
तळ्याचंच पाणी लागायचं.
*पाण्याचं वागन कीती वीसंगत,
पोहणार्याला बूडवून,
प्रेताला ठेवत तरंगत.
Thursday, 8 December 2011
माझ गाव (महिंद)
माझा गाव
निळ्या खाडीच्या काठाला
माझा हिरवाच गाव.
जगात मी मिरवितो
त्याचे लावुनिया नाव !
पूल ओलांडिता पुढे
रस्ता येईल तांबडा.
घरी आणील सरळ
जरी दिसला वाकडा.
माणसांच्या जागीसाठी
दाटी करितात माड.
गर्द मधेच एखादे
आंब्या फणसाचे झाड.
असो झाडी किंवा वाडी
सुने नाही वाटायचे.
नादी आपुल्याच कोणी
तेथे गात असायचे.
थोडया पायवाटा हिंडा
लालतांबडया वाकडया.
होडया उपडया झालेल्या
तशा बघाल टेकडया.
जेथे होईल माध्यान्ह
तेथे पान वाढलेले.
काळोखात कुणीतरी
ज्योत घेउन आलेले.
माझा गाव
असा ओव्यांतच गावा.
तेथे जावून राहून
डोळे भरून पाहावा.
Wednesday, 7 December 2011
आयुष्य....
आयुष्य....
कधी वादळी वाट..
कधी झुळझुळता पाट..
कधी थंड वारा..
कधी डोळ्यांत उष्ण धारा..
कधी मनात भावनांची गर्दी..
कधी गर्दीत मन एकटे..
कधी नात्यांचा होतो पसारा..
कधी पसाऱ्यात हरवते नाते..
कधी ओठांत शब्द अबोल..
कधी डोळ्यांना वाचा फुटते..
कधी हृदयात खुपत्या वेदना..
कधी मृगजळ हातातून सुटते..
आयुष्य...
कधी जगण्याचा कंटाळा येतो...
कधी मरण्याचा मोह होतो..
कधी भेटतो जिवलग कोणी..
अन अवेळी, जीव कंठात येतो!!
कधी वादळी वाट..
कधी झुळझुळता पाट..
कधी थंड वारा..
कधी डोळ्यांत उष्ण धारा..
कधी मनात भावनांची गर्दी..
कधी गर्दीत मन एकटे..
कधी नात्यांचा होतो पसारा..
कधी पसाऱ्यात हरवते नाते..
कधी ओठांत शब्द अबोल..
कधी डोळ्यांना वाचा फुटते..
कधी हृदयात खुपत्या वेदना..
कधी मृगजळ हातातून सुटते..
आयुष्य...
कधी जगण्याचा कंटाळा येतो...
कधी मरण्याचा मोह होतो..
कधी भेटतो जिवलग कोणी..
अन अवेळी, जीव कंठात येतो!!
मन एव मनुष्याणाम्
मन एव मनुष्याणाम्
डॉ. श्री बालाजी तांबेमन मनास उमगत नाही, हे खरंच. मन हे इंद्रिय अन्य इंद्रियांसारखं एखाद्या अवयवाला चिकटून येत नाही, त्यामुळे ते कुठंय ते सांगता येत नाही; पण ते असं इंद्रिय आहे, की जे सर्व शरीराला व्यापून असतं. प्रत्येक गोष्टीचं ज्ञान आणि अन्य इंद्रियांची कार्ये मनाच्या सहभागाशिवाय होत नाहीत. मन प्रसन्न असेल तर सारं जग सुंदर असतं. मनाची अप्रसन्नता सारं जगणं दुर्मुखलेलं करतं.
हा शरीर व आत्मा यांच्यामधला एक महत्त्वाचा दुवा असतो. इंद्रियांची कार्येसुद्धा मनाशिवाय होत नसतात. मन हे स्वतःसुद्धा एक इंद्रियच आहे. मन हे असं इंद्रिय आहे की जे सर्व शरीराला व्यापून असतं, शरीरातील सर्व लहान-मोठ्या घडामोडींना सहायक स्वरूप असतं.
कोणत्याही गोष्टीचं ज्ञान होण्यासाठी आत्म्याची प्रेरणा जशी हवी, तसाच मनाचा सहभागही अत्यावश्यक आहे. कानाने आवाज तेव्हाच ऐकू येतो जेव्हा मन श्रोत्रेंद्रियाशी संबंधित असते. आपण प्रत्यक्षातही हा अनुभव कैक वेळा घेतो, की वाचनात दंग असताना एखादी व्यक्ती शेजारी येऊन उभी राहिली तर कळत नाही, पण टीव्हीवर आवडता कार्यक्रम पाहात असताना आईला मुलाने मारलेली हाक ऐकू येते. म्हणजेच मन ज्या इंद्रियाशी संबंधित असते त्याच विषयाचे ज्ञान होते, बाकीचे विषय ज्ञात होऊ शकत नाहीत.
मन मोलाचं
मन फार महत्त्वाचं आहे. कारण मन हे अहंकार, बुद्धी व इंद्रियांवरही आपला अधिकार गाजवू शकते.
मनाची कार्ये सांगताना चरकाचार्य म्हणतात -
इन्द्रियाभिग्रहः कर्म मनसः स्वस्यनिग्रहः । उहो विचारश्च ततः परः बुद्धिः प्रवर्तते ।।...चरक शारीरस्थान
इंद्रियांचे नियंत्रण करणे हे काम मनाचे आहे. "उह' म्हणजे ऊहापोह अर्थात अमुक गोष्ट केल्यास काय होईल व त्याचा परिणाम बरा-वाईट असा होईल व लाभ किंवा हानिकारक काय हे ठरविते ती बुद्धी. बुद्धीने बरे-वाईट काही सांगितले तरी इंद्रियांच्या कर्माची जबाबदारी मनाचीच असते. इंद्रिये स्वतःच्या विषयाकडे आकर्षित झाली की त्यावर मनाचा ताबा राहात नाही म्हणून इंद्रियविजय व मनःशक्ती वाढविणे हे उपाय महत्त्वाचे ठरतात.
एकदा मन नियंत्रणाखाली आले की शरीर-मानस व्यापार सुरळीत चालतात. म्हणूनच आयुर्वेदशास्त्रच नाही तर बाकी योगशास्त्र, अध्यात्मशास्त्रही "मनावर ताबा ठेवणे' ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट मानतात व त्या दृष्टीने उपायही सांगतात.
मन सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणांनी युक्त असते. खरं तर यातील सत्त्व हा "गुण' असून रज व तम हे "दोष'च समजले जातात. सत्त्वगुणाचे प्राधान्य असणारे मन शुद्ध, प्रसन्न व संशयरहित असते आणि अशा मनाचे स्वतःवरही पूर्ण नियंत्रण असते. मन हे अन्नमय आहे हे सर्वच प्राचीन भारतीय शास्त्रांनी आणि आधुनिक विज्ञानानेही मान्य केले आहे. आपण जे खाऊ तसं आपलं मन घडत जातं म्हणूनच आयुर्वेदशास्त्रात सात्त्विक आहाराची प्रशंसा केली आहे. मन हे उभयेंद्रिय असल्यामुळे त्यावर जडाच्या दिशेनं अन्नाचा व चैतन्याच्या दिशेनं आत्म्याच्या सात्त्विकतेचा परिणाम होत असतो.
Monday, 5 December 2011
परीस (पारस )
प
एक माणूस परीस ( पारस ) शोधायला निघाला.... त्यासाठी रस्त्यात जो दगड येईल तो घ्यायचा, गळ्यातल्या साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा असा त्याचा दिनक्रम सुरू झाला दिवस गेले... महिने लोटले... वर्षे सरली.... पण त्याच्या दिनक्रमात बदल झाला नाही ....दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि मगतो फेकून द्यायचा.... शेवटी तो माणूस म्हातारा झाला.... आणि ज्या क्षणि तो आपले शेवटचे श्वास मोजत होता त्यावेळी अचानक त्याचे लक्ष त्याच्या गळ्यातील साखळीकडे गेले...ती साखळी सोन्याची झाली होती..... दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा या नादात त्याचे साखळीकडे लक्षच गेले नाही....
तात्पर्य:प्रत्येकाच्या जीवनात एकदा तरी परीस येत असतो...कधी आई- वडिलांच्या रूपाने, तर कधी भाऊ-बहीनीच्या नात्याने...तर कधी मित्राच्या मैत्रिणीच्या नात्याने .....तर कधीप्रेयसीच्या नात्याने..... कोणत्या ना कोणत्या रूपात तो आपल्याला भेटत असतो... आणि आपल्यातल्या लोखंडाचे सोने करीत असतो...... आपण जे काही असतो किवा बनतो त्यात त्यांचा बराच हातभार असतो ....... पण फार कमी लोक या परीसाला ओळखू शकतात .......रीस (पारस )परीस (पारस )
एक माणूस परीस ( पारस ) शोधायला निघाला.... त्यासाठी रस्त्यात जो दगड येईल तो घ्यायचा, गळ्यातल्या साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा असा त्याचा दिनक्रम सुरू झाला दिवस गेले... महिने लोटले... वर्षे सरली.... पण त्याच्या दिनक्रमात बदल झाला नाही ....दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि मग
तो फेकून द्यायचा.... शेवटी तो माणूस म्हातारा झाला.... आणि ज्या क्षणि तो आपले शेवटचे श्वास मोजत होता त्यावेळी अचानक त्याचे लक्ष त्याच्या गळ्यातील साखळीकडे गेले...
ती साखळी सोन्याची झाली होती..... दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा या नादात त्याचे साखळीकडे लक्षच गेले नाही....
तात्पर्य:
प्रत्येकाच्या जीवनात एकदा तरी परीस येत असतो...कधी आई- वडिलांच्या रूपाने, तर कधी भाऊ-बहीनीच्या नात्याने...तर कधी मित्राच्या मैत्रिणीच्या नात्याने .....तर कधी
प्रेयसीच्या नात्याने..... कोणत्या ना कोणत्या रूपात तो आपल्याला भेटत असतो... आणि आपल्यातल्या लोखंडाचे सोने करीत असतो...... आपण जे काही असतो किवा बनतो त्यात त्यांचा बराच हातभार असतो ....... पण फार कमी लोक या परीसाला ओळखू शकतात .......रीस (पारस )
एक माणूस परीस ( पारस ) शोधायला निघाला.... त्यासाठी रस्त्यात जो दगड येईल तो घ्यायचा, गळ्यातल्या साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा असा त्याचा दिनक्रम सुरू झाला दिवस गेले... महिने लोटले... वर्षे सरली.... पण त्याच्या दिनक्रमात बदल झाला नाही ....दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि मग
तो फेकून द्यायचा.... शेवटी तो माणूस म्हातारा झाला.... आणि ज्या क्षणि तो आपले शेवटचे श्वास मोजत होता त्यावेळी अचानक त्याचे लक्ष त्याच्या गळ्यातील साखळीकडे गेले...
ती साखळी सोन्याची झाली होती..... दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा या नादात त्याचे साखळीकडे लक्षच गेले नाही....
तात्पर्य:
प्रत्येकाच्या जीवनात एकदा तरी परीस येत असतो...कधी आई- वडिलांच्या रूपाने, तर कधी भाऊ-बहीनीच्या नात्याने...तर कधी मित्राच्या मैत्रिणीच्या नात्याने .....तर कधी
प्रेयसीच्या नात्याने..... कोणत्या ना कोणत्या रूपात तो आपल्याला भेटत असतो... आणि आपल्यातल्या लोखंडाचे सोने करीत असतो...... आपण जे काही असतो किवा बनतो त्यात त्यांचा बराच हातभार असतो ....... पण फार कमी लोक या परीसाला ओळखू शकतात .......
एकदा डोळ्यातल्या एका अश्रुने दुस-याला विचारले......
एकदा डोळ्यातल्या एका अश्रुने दुस-याला विचारले......
'ए आपण असे कसे रे
ना रंग, ना रूप,
नेहमीच चिडीचुप,
आनंद झाला तरी डोळ्यातुन बाहेर,
दु:खाच्या प्रसंगीही दुराव्याचा आहेर,
कोणीच कसे नाही थांबवत आपल्याला,
किनारा ही नाही साधा या पापण्याला............
दुस-यालाही मग जरा प्रश्न पडला,
खुप विचार करून तो बोलला,
रंग-रूप नसला तरी,
चिडीचुप असलो जरी,
आधार आपण भावनांचा,
आदर राखतो वचनांचा,
सान्त्वनांचे बोल आपण,
अंतरीही खोल आपण,
सुखात आपले येणे व्यक्तिपरत्वे,
दु:खाच्या प्रसंगी आपलेच महत्व,
आपल्याला नाही कोणी थांबवु शकत,
बंधनात नाही कोणी बंधवु शकत,
उद्रेक आपण मनातील वेदनांचा,
नाजुक धागा वचनातील बंधनांचा,
भावबंध ह्र्दयातील रुदनांचा,
स्वरबद्ध झंकार तनातील स्पन्दनांचा ,
म्हणुनच,
आपले बाहेर पड़णे भाग आहे,
आपल्यामुलेच आज हे जग आहे.
अशीच आपली कहाणी.........
ऐकून ही अश्रुची वाणी
अश्रुच्याच डोळ्यांत आले पाणी......................
Subscribe to:
Posts (Atom)