आयुष्य....
कधी वादळी वाट..
कधी झुळझुळता पाट..
कधी थंड वारा..
कधी डोळ्यांत उष्ण धारा..
कधी मनात भावनांची गर्दी..
कधी गर्दीत मन एकटे..
कधी नात्यांचा होतो पसारा..
कधी पसाऱ्यात हरवते नाते..
कधी ओठांत शब्द अबोल..
कधी डोळ्यांना वाचा फुटते..
कधी हृदयात खुपत्या वेदना..
कधी मृगजळ हातातून सुटते..
आयुष्य...
कधी जगण्याचा कंटाळा येतो...
कधी मरण्याचा मोह होतो..
कधी भेटतो जिवलग कोणी..
अन अवेळी, जीव कंठात येतो!!
कधी वादळी वाट..
कधी झुळझुळता पाट..
कधी थंड वारा..
कधी डोळ्यांत उष्ण धारा..
कधी मनात भावनांची गर्दी..
कधी गर्दीत मन एकटे..
कधी नात्यांचा होतो पसारा..
कधी पसाऱ्यात हरवते नाते..
कधी ओठांत शब्द अबोल..
कधी डोळ्यांना वाचा फुटते..
कधी हृदयात खुपत्या वेदना..
कधी मृगजळ हातातून सुटते..
आयुष्य...
कधी जगण्याचा कंटाळा येतो...
कधी मरण्याचा मोह होतो..
कधी भेटतो जिवलग कोणी..
अन अवेळी, जीव कंठात येतो!!
No comments:
Post a Comment