Saturday, 10 December 2011

***आयुष्याच्या चारोळ्या***


***आयुष्याच्या चारोळ्या***
*फूलाच आयूष्य फार खडतर असतं,
बहरलेल असताना भाळी असनं,
आणी कोमजून जाताच,
कोणाच्यातरी पायदळी असणं.

*झेपेल तेवढ दु:ख
तो आपल्याला देतो,
दिलेल दु:ख संपल की,
तो आपल्यालाच नेतो.

*मला पक्क ठाऊक आहे की,
प्रत्येक गोष्टीला अंत आहे,
म्हनून मी काही बोलत नाही,
मी अगदी शांत आहे.

*आपल्याला काही हव असन
म्हनजे आपल जगनं आहे,
येणार्या प्रत्येक क्षणांकडे,
आपल काही मागणं आहे.

*तळ्याकटच गवत तळ्याशी
सलगीन वागायचं कारण,
त्याला जगायला,
तळ्याचंच पाणी लागायचं.

*पाण्याचं वागन कीती वीसंगत,
पोहणार्याला बूडवून,
प्रेताला ठेवत तरंगत.

No comments:

Post a Comment